टॅरिफच्या तणावात डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट पाठिंबा.....

Foto
नवी दिल्ली : हमास आणि इस्त्रायलमधील युद्ध टोकाला पोहोचले आहे. अमेरिकेने या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला. गाझामधील शांततेसाठी अमेरिकेने एक प्रस्ताव तयार केला असून त्याला इस्त्रायलने देखील होकार दिला. यामुळे हे युद्ध थांबवले जाऊ शकते. मागील काही दिवसांपासून हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध इतके जास्त भडकले की, इतरही देशांना त्याची झळ बसताना दिसली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय. नरेंद्र मोदी यांनी गाझाच्या शांततेच्या प्रस्तावासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असल्याचे म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की,  गाझा युद्ध संपवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो पॅलेस्टिनी आणि इस्रायली लोकांसाठी तसेच व्यापक पश्‍चिम आशियाई प्रदेशासाठी दीर्घकालीन आणि शाश्‍वत शांतता, सुरक्षा तसेच विकासासाठी एक मोठा मार्ग प्रदान करते. आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की, सर्व संबंधित पक्ष राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पुढाकारामागे एकत्र येतील..
पुढे पीएम मोदींनी म्हटले, संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता सुनिश्‍चित करण्यासाठी या प्रयत्नांना अ्‌ाही पाठिंबा देतो. फक्त भारतच नाही तर भारतासोबतच अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलेल्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. सर्वांचे म्हणणे आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात ठेवलेल्या प्रस्तावामुळे कायम या भागात शांतता राहिला. इस्त्रायलने देखील याकरिता सहमती दर्शवली आहे.

या प्रस्तावात काही अटी आणि नियम दोन्ही देशांमधील पेटलेले युद्ध थांबवण्यासाठी आहेत. या प्रस्तावावर दोन्ही देशांच्या सह्या होणे बाकी आहे. मात्र, इस्त्रायलने हा प्रस्ताव मान्य केलाय. हमास काय निर्णय घेतो हे महत्वाचे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास आणि काही मुस्लिम देशांसोबत मिळून हा प्रस्ताव ठेवलाय. यामुळे या प्रस्तावाला हमासचा विरोध नसावा, असेही  सांगितले जातंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या मार्गातून अनेक दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याचे संकेत आहेत.